Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडपोसरी शिवतीर्थ येथे " कन्याथॉन मॅरेथॉन " चे दिमाखदार आयोजन !

पोसरी शिवतीर्थ येथे ” कन्याथॉन मॅरेथॉन ” चे दिमाखदार आयोजन !

मुलींना सक्षम व शिक्षित करण्यासाठी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची लक्षवेधी कल्पना…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींना सक्षम व शिक्षित करण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अन्याय अत्याचार विरोधात जागृती करण्यास सर्वांचेच लक्ष वेधण्याच्या हेतूने रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी सकाळी ६ वाजता कर्जत तालुक्यातील पोसरी येथील ” शिवतीर्थ ” या कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्यालया ठिकाणी ” कन्याथॉन मॅरेथॉन ” या स्पर्धेचं दिमागदार आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेसाठी विजयभूमी युनिव्हर्सिटी त्याचप्रमाणे कर्जत पोलीस अधिकारी वर्ग , अनेक कर्जतकर अशा २ हजार स्पर्धकांनी यांत भाग घेतला.

आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि विजय भूमी युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून या ” कन्याथॉन मॅरेथॉन ” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते . ” एक धाव , मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी ” या उपक्रमात दोन हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेचा आनंद लुटला . पोसरी ते चारफाटा व पुन्हा पोसरी असा मार्ग या मॅरेथॉन चा होता . यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी हिरवा झेंडा फडकवून या स्पर्धेला सुरुवात झाली , ब्लॅक पॅन्ट व व्हाईट शर्ट असा पेहराव सर्वांचा होता . यावेळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले तर तीन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, डी वाय एस पी विजय लगारे , मुख्याधिकारी अनुप दुरे , विजयभूमी युनिव्हर्सिटीचे सर्वेसर्वा संजय पटोदा साहेब, कल्पना पटोदा मॅडम, अनिल सर, विकास चित्ते, मीना थोरवे, रोटरी क्लबचे मेंबर तथा नगरसेवक ॲड. संकेत भासे, अभिषेक सुर्वे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page