Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडप्रत्येक गावात पाणी योजना नेल्या तरी पुढील आमदार तुम्हीच..पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव...

प्रत्येक गावात पाणी योजना नेल्या तरी पुढील आमदार तुम्हीच..पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा वाढदिवस कर्जतमध्ये मोठ्या जल्लोष्यात साजरा..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) दोन वर्षात पावणे चारशे व आता १६० करोड चा निधी बजेटमधून आणणारे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे हे पुढील कालावधीत पाणी योजना प्रत्येक गावात पोहोचविली तरी आमदार होतील , अश्या शुभेच्छा रुपी आशीर्वाद राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना अभिष्टचिंतन सोहळ्या दरम्यान आयोजित केलेल्या पोसरी ” शिवतीर्थ ” येथे कार्यक्रमात दिले.
कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आज दि.७ एप्रिल २०२३ रोजी पोसरी शिवतीर्थ येथे महाराष्ट्र राज्याचे मा.नाम. उद्योग मंत्री तथा रायगड – रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब , मा.नाम. गुलाबराव पाटील – मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता , महाराष्ट्र राज्य , मा. श्रीरंग आप्पासाहेब बारणे – खासदार मावळ , मा. श्री. भरतशेठ गोगावले पक्ष प्रतोद तथा आमदार महाड मतदारसंघ , मा. महेंद्रशेठ दळवी , आमदार अलिबाग मतदारसंघ , आदी प्रमुख मान्यवर सहित कर्जत – खालापूर मधील उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक संतोष शेठ भोईर , ता.प्रमुख संभाजी जगताप , जिल्हा महिला संघटिका रेखा ठाकरे , शिवराम बदे , नगरसेवक संकेत भासे , कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम खान , शिवसेना व महिला , युवासेना पदाधिकारी , मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर आयोजित समाजपयोगी कार्यक्रमाची सांगता सभेत व पक्षप्रवेशांनी झाली.मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की , १९८२ साली मी सुध्दा पान टपरी चालवत होतो , मात्र बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांनी ” शिवसेना ” या अग्निकुंडात झोकून दिले . बाळासाहेबांनी सर्वांना मोठे केले , ज्याच्यावर केस नाही , तो शाखाप्रमुख नाही ,असे बाळासाहेब म्हणत , यावर त्यांनी प्रकाश टाकत , खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले , चहा पेक्षा किटली गरम , असे म्हणत , त्यांच्यामुळेच आम्ही वेगळा मार्ग बदलला , हे सांगितले . शिवसेनेचे कार्यालय म्हणजे न्यायालय , अशी बाळासाहेबांची शिकवण , आम्ही भगव्याशी प्रतारणा करणार नाही , हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही , ज्या राष्ट्रवादीने अनेकांना फोडले , त्यांच्या बरोबर युती करताय , ” संजय राऊत खुद्गार आणि आम्ही कुठले गद्दार ” ,असा टोला हि त्यांनी लगावला . पुढच्या वेळी महेंद्रशेठ ३६ हजारच्या आघाडीने निवडून येणार , नुसत्या पाण्याच्या कामावरच आपण पुढील आमदार होणार , असा आशीर्वाद त्यांनी आजच्या प्रसंगी दिला.

तर रायगडचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत महेंद्रशेठ थोरवेच आमदार असणार आहात , हे सांगत त्यांच्यात निधी कसे आणायचे , हे कसब आहे , करोडो रुपयांचा निधी मतदारसंघात त्यांनी आणला ,भविष्यात मोठ्यात मोठा निधी या मतदारसंघात देणार ,अशी वाढदिवसाची भेट त्यांनी बोलून दाखविली . आज मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला , म्हणाले वाढदिवसाला उपस्थिती महत्वाची आहे , एव्हढं जवळचे हे तुमचे आमदार महेंद्रशेठ आहेत , अशी प्रशंसा त्यांनी केली . तर खासदार आप्पासाहेब बारणे यांनी लोकांच्या सानिध्यात राहून लोकांची कामे करणारा लोक प्रतिनिधी , अशी उपमा त्यांनी महेंद्रशेठ थोरवे यांना दिली . आमदार भरतशेठ गोगावले यांनी जमलेली गर्दी हि निष्ठावंतांची आहे , सर्वांना घेऊन चला , हा संदेश त्यांनी देऊन बाळासाहेबांचे शिव धनुष्य जमिनीवर टेकवून देणार नाही , अशी शिवगर्जना केली.

आजच्या वाढदिवसानिमित्त जमलेले शिवसैनिक – माता भगिनी व आलेले मान्यवर बघून आमदार महेंद्रशेठ थोरवे भारावून गेले . जमलेली गर्दी हिच माझी ताकद , हिच माझी संपत्ती आहे , हे सांगत किती संकटे आली , मात्र बाळासाहेबांची शिकवण म्हणून डगमगलो नाही , बाळासाहेबांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले , सामान्य नागरिक आमदार झाले , मी देखील कुठलीच निवडणूक लढलो नाही , २०१४ ला थोड्या मताने मी पराभूत झालो , मला तिकीट दिले गेले नाही , २०१९ ला शिव सैनिकांच्या जोरावर १८ हजार मतांनी निवडून आलो , मी सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे , हे ” शिवतीर्थ ” अफाट मेहनतीवर कमावले आहे , आज माझा मुलगा लंडन ला शिकत आहे , पण एके काळी ५ हजार रू ऍडमिशन साठी नव्हते , सुरभी जन्माला आली , त्यावेळी हॉस्पिटलचे बिल भरायला ८ हजार नव्हते , मात्र शिवसेनेचा आजचा वटवृक्ष करताना खूप संघर्ष केला , ३ आमदार शिवसेनेचे मात्र पालकमंत्री म्हणून शेंबड्या मुलीला करता , हे चुकीचे आहे ,म्हणूनच पालकमंत्री हटाव मोहीम राबविली , अडीच वर्षात खूप सहन केलं , असे नाव न घेता त्यांनी विरोधकांवर टिका केली . ” बाळासाहेब भवन ” या संपर्क कार्यालयामधून नागरिकांची कामे स्फूर्तीने होतील , असे आश्वासन त्यांनी आजच्या प्रसंगी सर्वांना दिले . त्यांचे भावनिक बोल आजची सभा जिंकण्यास सार्थकी ठरली . यावेळी अनेकांचा पक्षप्रवेश याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page