आजचा दिवस कर्जतच्या धार्मिक इतिहासातील ” सुवर्ण ” योग – आमदार महेंद्र शेठ थोरवे..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजचा सोहळा सर्वांनी पाहिला आहे , खरोखर आजचा दिवस कर्जतच्या धार्मिक इतिहासातील ” सुवर्ण ” योग आहे . आपण सर्वांनी उल्हास नदी तीरावर ” श्री विठ्ठल मूर्ती ” पाहिली आता ही हिंदू संस्काराची परंपरा तेवत रहावी म्हणून आमच्या संकल्पनेतून ” प्रभू श्रीरामाची मूर्ती ” साकारली आहे , असे भावनिक मत कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जत – दहिवली येथे प्रभू श्रीराम मूर्तीचे दिमाखदार लोकार्पण व उद्घाटन मान्यवर व संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर महंत श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर श्री महंत चंद्रदेवदासजी महाराज गुरु कमलदासजी महाराज कल्याण – महाराष्ट्र , आमदार महेंद्र शेठ थोरवे , माजी आमदार सुरेश भाऊ लाड , शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील , आर पी आय चे नेते कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , जिल्हा संघटक संभाजी जगताप , भाजप जिल्हा महासचिव दिपक बेहेरे , मंगेश म्हसकर , कर्जत ता. अध्यक्ष राजेश भगत , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , मा. नगरसेवक बळवंत घुमरे , मा. नगरसेवक संकेत भासे ,शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , दिनेश कडू , सौ . मीना ताई थोरवे , त्याचप्रमाणे महायुतीतील सर्व पदाधिकारी , महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणाले की , प्रभू श्रीरामाचा हा लढा अनेक वर्षांपासूनचा असून यांत अनेकांनी बलिदान दिले , वंदनीय बाळासाहेब म्हणाले होते की , काश्मीर मुक्त व राम मंदिर बांधू हे स्वप्न पूर्ण झाले असून देव ते देश व राम ते राष्ट्र , मोदींनी पूर्ण करून दाखविल्याचे त्यांनी सांगितले . प्रभू श्रीरामाच्यारूपाने हिंदुत्वाचा विचार आत्मा येथे वसले आहे , त्यांचे विचार आत्मसात करा , असे आवाहन त्यांनी केले . आजच्या दिनी मला आनंद होत आहे ,माझं स्वप्न होत कर्जत बदलायच , हे धार्मिक श्रद्धेचे बळ स्थान चंद्र सूर्य असेपर्यंत या मूर्ती उभ्या असणार आहेत . झालेल्या निवडणुकीत सर्वांच्या सहकार्याने मी पुन्हा निवडून आलो , या विजयात सुरेश भाऊंच फार मोठ योगदान आहे , त्यांचे सहकार्य मी कदापि विसरणार नाही , असे गौरोदगार त्यांनी काढले . विकास कार्याला चालना देण्याचं काम पुन्हा एकदा जोमाने होऊन पाण्याची समस्या लवकरच सोडविली जाईल . ५६ करोड रु . ची पाण्याच्या स्कीम चे काम फक्त २० टक्के राहिले आहे , या मतदार संघात कधीच पाणी कमी पडणार नाही , असे मा. आमदार सुरेश भाऊ लाड यांनी पाणी प्रश्न लवकर सोडवा , यावर त्यांनी आश्वासन दिले .तर दरवर्षी या स्थळी पालखी सोहळा कार्यक्रम करावा , अशी विनंती त्यांनी केली . यावेळी मा. आमदार सुरेश भाऊ लाड , महंत यांनी देखील मार्गदर्शन करून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या या कार्याचे कौतुक केले .
यावेळी ” द स्वरबरसात ” इव्हेंट प्रस्तुत , प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित संगीतमय रामकथा ” मन हो रामरंगी रंगले हा संगीत गाण्याचा कार्यक्रम झाला . यावेळी मोठ्या संख्येने श्रीराम भक्त , कर्जतकर नागरिक उपस्थित होते . सर्वांनी मनोभावे श्रीराम नवमी असल्याने प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले .