Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळालॉकडाऊन होणार नसल्याच्या निर्णयाचे शहरातील किरकोळ व्यावसायिकांकडून स्वागत...

लॉकडाऊन होणार नसल्याच्या निर्णयाचे शहरातील किरकोळ व्यावसायिकांकडून स्वागत…

लोणावळा शहरात लॉकडाऊन होणार नाही नगरपरिषदेच्या ह्या निर्णयाचे शहरातील व परिसरातील नागरिक तसेच किरकोळ दुकान व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पाच महिने लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवसाय बुडाले होते.

नुकतेच प्रशासनाने लोणावळा शहरातील लॉकडाऊन हटविल्याने छोटे मोठे व्यवसाय पूर्व स्तरावर येण्याच्या तयारीत असताना शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार ह्या चर्चेने शहर व परिसरात खळबळ उडाली होती. त्याच अनुषंगाने लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, मुख्याधिकारी रवी पवार, डॉ.अमोल अगरवाल, नगरसेवक राजाभाऊ खळदकर, शिवदास पिल्ले, निखिल कवीश्वर समवेत सर्व पत्रकार उपस्थित होते. सदर परिषदेमध्ये प्रशासकीय स्तरावर लॉकडाऊन होणार नाही असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पाच महिन्याच्या लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत ते पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत, पुन्हा लॉकडाऊन केल्यास नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात जरी लॉक डाऊन होणार नसेल तरी शहर व परिसरातील नागरिकांनी स्वतःच आपली काळजी घेणे गरजेचे आहे.

घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे, गर्दी टाळणे, सेनेटायझरचा वापर करणे, तसेच नागरिकांनी स्वयंशिस्तीने कंटेनमेन्ट झोनचे पालन करत इतर शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने यावेळी करण्यात आले होते. प्रशासनाच्या ह्या निर्णयाने शहर व परिसरातील लहान मोठया व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आम्ही स्वतःची आणि ग्राहकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊ असे आश्वासन ह्या किरकोळ दुकान व्यावसायिकांकडून देण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page