Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रप्रायव्हेट वाहनांसाठी ई-पास बंधनकारक: गृहमंत्री अनिल देशमुख..

प्रायव्हेट वाहनांसाठी ई-पास बंधनकारक: गृहमंत्री अनिल देशमुख..

अष्ट दिशा वृत्तसेवा, प्रतिनिधी, संतोष पवार,
दि.२४/०८/२०२०

मुंबई: केंद्र सरकारने राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-पास रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. महाराष्ट्रात मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल जी देशमुख यांनी दिली आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे .अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल जी देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे ई-पास सह सर्व नियम कायम राहण्याच स्पष्ट झाला आहे. यापुढेही राज्यात खासगी वाहनांमधून प्रवास करताना ई-पास बंधनकारक आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page