Wednesday, May 29, 2024
Homeपुणेकामशेतबब्बी दा पंजाबी ढाबा लॉक डाऊन संपेपर्यंत सिल.... ...

बब्बी दा पंजाबी ढाबा लॉक डाऊन संपेपर्यंत सिल…. कामशेत पोलीसांनी केली कारवाई.

कामशेत दि.1: कामशेत हद्दीतील नायगाव मधील बब्बी दा पंजाबी ढाबा अँड रेस्टॉरंट हे शासनाच्या लॉक डाऊनचा कालावधी संपेपर्यंत सील करून 10 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला असून ढाबा मालक व कर्मचारी यांच्याविरोधात भा. द. वी.कलम 288,269,270,34 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33(w)131 व साथरोग नियंत्रण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.

वारंवार सूचना देऊनही महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणे बब्बी दा पंजाबी ढाबा अँड रेस्टॉरंटचे मालक व कर्मचारी यांना महागात पडले त्यासंदर्भात ढाबा मालकासाह आरोपी 1) विनोद रामशंकर यादव,2)जयनारायण सुदामा शाहा, 3)बुटासिंग उर्फ हॅपीसिंग मुख्यात्यसिंग मुलताणी,4)रणजित दारासिंग भट्टी,5)गोरख शांताराम मोडुळे, 6)साजनसिंग सतनामसिंग मल्ली सर्व राहणार सध्या बब्बी दा पंजाबी ढाबा, नायगाव, मावळ, पुणे यांच्या विरोधात कामशेत पोलीस स्टेशन भाग 6 गु. र. नं.210/201 भा. द. वी.कलम 288, 269, 270,34 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33(w )131 व साथरोग नियंत्रण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी बब्बी दा पंजाबी ढाबा अँड रेस्टॉरंटचे मालक करमजीत मुलताणी याच्या विरोधात दि.1/4/2021 रोजी शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत ढाबा सुरु ठेवल्याप्रकरणी कामशेत पोलीस स्टेशनमध्ये भा. द. वी.कलम 188,269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी वारंवार सूचना देऊनही दि.1/5/2021 रोजी रात्री 12:10 वा. च्या सुमारास ढाबा सुरु असून तिथे उपस्थित ग्राहकांकडून सोशल डिस्टंसिंग नाही , तोंडाला मास्क नाही, सॅनिटायझरचा वापर नाही अशा अवस्थेत रात्री उशिरापर्यंत ढाबा सुरु असल्याचे पोलिसांना मिळून आला असता 10,000 रुपये दंड आकारत ढाबा मालकावर गुन्हा दाखल करून ढाबा सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.


सदर कारवाई करून ढाबा सील करण्याबाबतचा अहवाल कामशेत पोलीस स्टेशन ने मा. दंडाधिकारी वडगाव मावळ यांना तात्काळ सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच केंद्र शासन व राज्य शासन यांच्या आदेशाचे उल्लंघन करणारे नागरिक असो, हॉटेल आस्थापना असो वा इतर आस्थापना असो यांच्यावरही वरील प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page