
प्रतिनिधी ( दत्तात्रय शेडगे)
खालापूर : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील करंबेळी ग्रामपंचायत हद्दीतील बापदेवपट्टी हे गाव गेल्या 20 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे.या ठिकाणी पावसाळ्यात मोठं मोठया दरडी कोसळून जीवीत हानी होत असून, येथील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहेत.
हे गाव गेल्या 20 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे धनविकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची आज ०३/१०/२०२१ रोजी बाबदेवपट्टी ग्रामस्थांसह भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन येत्या 20 आक्टोबर पर्यंत या गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेस सुरूवात करावी. अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष उग्र आंदोलन पुकारनार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष भगवानभाई ढेबे व संतोष ढवळे धनवीकर यांनी दिला आहे.
तर या निवेदनात कडापूर ते धनवी मार्गे जोर रस्ता ,खर्डी खुर्द ते हुंबरी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्त करावा. तसेच धनवी ते घरोशीवाडी रस्ता, जोर धनगरवाडी (वयली) ते कुंभे ग्रामपंचायत रस्ता व करंबेळी ते करंबेळी धनगरवाडी ( हुंबेवाडी ) रस्ता हे तीन रस्ते जनतेची गैरसोय होत असल्याने नवीन तयार करावे अशी मागणीही राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख- संतोष ढवळे धनविकर यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर, माणगाव तालूका अध्यक्ष रविंद्र सुतार यांनी खर्डी खुर्द आदिवासीवाडी ते खर्डी खुर्द धनगरवाडी ( पळसोंडा ) हा रस्ता नवीन करण्याची मागणी निवेदन द्वारे केली. तसेच , माणगाव तालूका अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सिकंदर येस्वीकर यांनी जोर ते जोर धनगरवाडी ( वयली ) हा देखील नवीन रस्ता करण्याची मागणी निवेदन द्वारे केली.
यावेळी सोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्री भगवानभाई ढेबे, रा.स.प. चे जेष्ठ नेते श्रीकांतभाई भोईर , रा.स.प. चे जेष्ठ नेते हसमुखलाल शहा , रा.स.प. चे जेष्ठ नेते विजयशेठ कोलगे , जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मणिषाताई ठाकुर, पक्षाच्या नेत्या पुष्पाताई ढवळे , माणगाव तालुका अध्यक्ष रविंद्र सुतार , माणगाव ता. अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सिकंदर येस्वीकर,
युवा नेते किरणशेठ ढवळे , निजामपूर विभाग अध्यक्ष अंकुशशेठ झोरे, रा.स.प. नेते नथुरामशेठ मरगाळे, युवा नेते रोहिदासशेठ झोरे, उपसरपंच भाऊशेठ सुतार ,रा.स.प. नेते पप्पूशेठ सुतार, अमितशेठ वरक, धनवी ग्रामस्थ, बादेवपट्टी ग्रामस्थ, जोर ( वयली ) ग्रामस्थ, खर्डी खुर्द पळसोंडा ग्रामस्थ, नेरव सुतारवाडी ग्रामस्थ, माणगाव तालूक्यातील रा.स.प चे कार्यकर्ते आदि उपस्थित होते.