बाबदेवपट्टी धनगरवस्ती आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत..

0
151


पावसाळ्यात या गावात कोसळतात दरडी माळीणची,पुनरावृत्ती होण्याची शक्यता.मात्र प्रशासनाकडून अद्याप पुनर्वसन नाही…

खोपोली- दत्तात्रय शेडगे

माणगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या बाबदेवपट्टी धनगर वस्ती आजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून, येथिल नऊ कुटुंबाचे अजूनही प्रशासनाने पुनर्वसन केले नाही.


तालुक्यातील करंबेळी ग्रामपंचायत हद्दीत ही धनगर वस्ती येत असून, डोंगराच्या कुशीत हे गाव वसले असून, पावसाळ्यात या गावात मोठं मोठ्या दरडी कोसळून घरापर्यंत येतात याची दखल प्रशासनाने घेत हा भाग दरड ग्रस्त भाग म्हणून घोषित केला असून, येथील नऊ कुटूंबांचे पुनर्वसन करण्याचा सूचना प्रशासनाने दिला आहेत.


याबाबत चंद्रकांत झोरे व स्थानिक ग्रामस्थ याचा 2005 पासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अजूनही त्यांचे पुनर्वसन केले नाही. या भागात वीज, रस्ता, शाळा, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा आजही नाहीत त्यामुळे येथील नागरिकांच्या पदरी आजही उपेक्षाच पडली आहे.


बावदेव पट्टी येथील नऊ कुटूंब भयभीत होऊन विविध ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या आश्रयास जाऊन राहिले आहेत. मात्र, प्रशासन आमचे गावचे पुनर्वसन करेल व आम्ही पुन्हा एकत्र येऊ या आशेने आजही ही नऊ कुटूंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असून, आम्ही आजही दुसऱ्याच्या गावात जाऊन पाहुण्यासारखे दिवस काढत आहेत.


प्रतिक्रिया-
आमच्या गावचे पुनर्वसन व्हावे यासाठी आम्ही गेले अनेक वर्षे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत मात्र प्रशासन आमच्या या मागणी कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत,आमच्या गावातील 9 कुटूंब भयभीत होऊन आम्ही नातेवाईक यांच्या कडे पाहुण्यासारखे जाऊन राहिलो आहोत. प्रशासनाने आमचे लवकरात लवकर पुनर्वसन केले नाही तर आम्ही बापदेव पट्टी या गावात जाऊन राहणार आहेत मात्र पुन्हा माळीण सारखी घटना घडली तर याला प्रशासन जबाबदार असेल.

चंद्रकांत झोरे ग्रामस्थ- बापदेवपट्टी धनगर वस्ती

तरी कृपया जिल्ह्यातील सर्व जबाबदार प्रतिनिधी व प्रशासन यांनी सदर अतिगंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते संतोष ढवळे-धनवीकर यांनी केली आहे.अन्यथा सदर भयभीत कुटुंबांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने संतोष ढवळे-धनवीकर उपोषणास बसणार आहेत.