बालदिगंबर वारकरी संप्रदाय मंडळाने दिली बाळूमामा मंदिराला भेट…

0
161

खोपोली-दत्तात्रय शेडगे

कर्जत तालुक्यातील कडाव येथील बाल दिगंबर वारकरी संप्रदाय मंडळ यांनी आज लोणावळा येथील श्रीसंत बाळूमामा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.


गेल्या अनेक वर्षांपासून बाल दिगंबर वारकरी संप्रदाय मंडळ हे श्रीसंत ज्ञानोबा रायांच्या दर्शनासाठी आळंदी येथे दिंडी काढून पालखी घेऊन चालत प्रवास करीत असतात मात्र या वर्षी देशावर कोरोना महामारीचे मोठे संकट असल्याने या मंडळाने मोजकीच वारकरी घेत गाड्यातून आळंदी येथे प्रयाण केले.

जाताना वाटेत असलेल्या शिंग्रोबा घाटातील शिंग्रोबा देवाचे दर्शन घेत लोणावळा येथे असलेले श्रीसंत बाळूमामा देवाचे दर्शन घेऊन हे वारकरी संप्रदाय यांनी आळंदी कडे प्रस्तान केले यावेळी हभप कडव ,हभप पवाली, आदींसह अनेक वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.