Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडबालविकास प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप….

बालविकास प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप….


खोपोली – दत्तात्रय शेडगे

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत धनगर समाज युवक विद्यार्थी विकास संस्था पेण तालुका आणि श्री डी बि पाटील सामाजिक विकास संस्था पेण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बालविकास प्रकल्प सन २०२१-२२ अंतर्गत दुर्गम भागातील महाल मिऱ्या डोंगरातील रायगड जिल्हा प्राथमिक शाळा आसाणी, बांधणी,भोगोली,वेत्ताळपट्टी बंगलवाडी या शाळेतील सुमारे ६० गोर- गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी पेण चे माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अॅड निलिमाताई पाटील, जिल्हा परिषद सभापती डी बि पाटील (काका ) जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, रामेश्वर कंन्ट्रक्शन चे राजुशेठ पिचिका, शेकाप तालुका चिटणीस, संजयभाई डंगर सामाजिक कार्यकर्ते रशाद शेठ मुजावर हाॅटेल राजे शिवराय चे नंदेशशेठ पाटील प्रिमियर मोटर्स चे अॅड मनियार साहेब, अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष रूपेशदादा कदम ,शेकाप कामार्लीगण चिटणीस दिनेशभाई खैरे, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील सर सरपंच बोरगाव नामदेव महाडीक सामाजिक कार्यकर्ते, महेशशेठ पाटील रायगड भुषण संतोष पाटील ,राजेश रसाळ, जगदीश डंगर, रमेश पाटील,यांचे मोलाचे सहकार्य लाभले व या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित अर्णव मैत्रेय फाऊंडेशन अध्यक्ष बळीराम पाटील संचालिका सौ सारीकाताई पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष रूपेशदादा कदम डाॅ मानसीताई कदम प्रकल्प सन्मन्वयक तथा संस्थेचे अध्यक्ष विजय उघडे धनगर समाज युवक अध्यक्ष सचिन उघडे प्रकल्प प्रमुख संजय तिवले डी बि पाटील सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी राहुल कोकरे धनगर समाज तालुका खजिनदार बाळु उघडे आधी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद शाळा प्रमुख सुरेश पाटील, सुजाता पाटील, वासुदेव जेधे,राजु आखाडे,किसन पाडवी यांनी बालविकास प्रकल्पाचे आधी स्वागत करून आभार व्यक्त केले व कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया..
कोरोना वायर्स चे जगावर असलेले महास़कटामुळे सर्व सामान्य कुटुंबाचे संसार विस्कटलेले आहे, एकीकडे प्रचंड शिक्षणाची जिद्द आणि दुसरीकडे कुटुंब विस्कटलेले परिस्थिती, कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून बालविकास प्रकल्प ची स्थापना करुन सर्व गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना या प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक साहीत्य वाटप करण्यात येते तरी समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढे येऊन मदत करणे आवश्यक आहे.

श्री विजय रामा उघडे प्रकल्प सन्मन्वयक तथा संस्थेचे अध्यक्ष.
- Advertisment -