Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्रबिबट्याला पकडण्यासाठी करमाळा तालुक्यात ऊस पेटवला तरीही बिबट्या पळाला.

बिबट्याला पकडण्यासाठी करमाळा तालुक्यात ऊस पेटवला तरीही बिबट्या पळाला.

सोलापुर,प्रतिनिधी, संतोष पवार

दि: ०८/१२/२०२० करमाळा: तालुक्यात बिबट्याने आत्तापर्यंत तीन बळी घेतले आहेत.काल दि.०७/१२/२०२० करमाळा तालुक्यातील चिखलठान येथील लांडा हिरा भागात बिबट्याने एका ऊस तोड मजुराच्या मुलीचा बळी घेतला.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्याच बरोबर करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदें,माजी आमदार नारायण आबा पाटील, तहसीलदार समीर माने, उपविभागीय अधिकारी डॉ विशाल हिरे,पो.निरीक्षक श्रीकांत पाडुळे,या ठिकाणी दाखल झाले.

ज्या ऊसात बिबट्या शिरला होता.तो ऊस पेटवून देण्यात आला.तिन्ही बाजुने ऊस पेटवुन देण्यात आला व एका बाजुने वाघर लावण्यात आली.पेटवलेल्या ऊसाच्या चारही बाजूने शार्प शुटर होते.

बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी आलेले पथके होते.वनकर्मचारी होते.तरीही सर्वांना चकवा देत बिबट्या यांच्या तावडीतुन पळाला.त्यामुळे नागरिकांमधुन वनविभागा विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page