Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाबिल्कीस बानो अत्याचारातील दोषींच्या मुक्तातेच्या निषेधार्थ लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध...

बिल्कीस बानो अत्याचारातील दोषींच्या मुक्तातेच्या निषेधार्थ लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध…

लोणावळा(प्रतिनिधी): बिल्कीस बानो या पीडितेवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींची निर्दोष मुक्तता केल्याच्या निषेधार्थ लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून गुजरातमधील भाजपा सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

बिल्कीस बानो हिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली होती. त्या अकरा दोषींची निर्दोष मुक्तता करून महिलांवरील अत्याचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या गुजरातमधील भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बॅनरबाजी व नारेबाजी करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, महिला अध्यक्षा उमा मेहता, यशवंत पायगुडे, विध्यार्थी अध्यक्ष आदित्य पंचमुख, प्रवक्ता फिरोज शेख, आरोही तळेगावकर, नेहा पवार, सनी पाळेकर, समीर खोले, जयेश देसाई, सय्यद खान, प्रवीण करकेरा, शिला बनकर, अमोल ओंबळे, राजू बोराटी, अभय परदेशी,राजेश मेहता आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page