बेकायदेशीर गावठी कट्टा वापरणाऱ्या पवना नगर येथील इसमास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली अटक…

0
1337

लोणावळा बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या खंडू अशोक कालेकर उर्फ के. के. ( रा. पवना नगर, ता. मावळ ) यास एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसासह पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पवना नगर येथे एक इसम हत्यार बाळगून आहे.

माहिती मिळताच कॉवत यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांचे एक पथक तयार करून पवना नगर येथे पाठविले. सदर पथकाने खंडू याच्या घराबाहेर सापळा लावला व त्याला आवाज देऊन बाहेर बोलावले असता खंडू याने बाहेर येताच पोलिसांना पाहून पळ काढत असताना मोठया चतुराइने पोलिसांनी त्याला पकडले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल व तीन जिवंत काडतूस पोलिसांना मिळून आले.

खंडू याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक संतोष शेळके, पोलीस शिपाई स्वप्नील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे करत आहेत.