![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी):बेगडेवाडी येथे रेल्वे रुळ ओलांडत असताना एका 40 वर्षीय अज्ञात इसमाचा लोकल गाडीची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 26 रोजी रात्री 8:15 वा.च्या सुमारास घडली आहे.
मयताची ओळख अद्याप पटली नाही. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्यांनी दिलेल्या वर्णणानुसार, अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष, शरीर बांधा मध्यम उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, रंग काळा सावळा,नाक बसके, हाता पायावर जळालेले जुने व्रण, अंगात पांढ-या रंगाचा फुल भायांचा शर्ट, त्यावर निळ्या रंगाचे ठीपके, नेसनीस खाकी रंगाची कॉटन फुल पॅन्ट, पायात काळ्या रंगाची सॅन्डल असे मयतचे वर्णन आहे.
मयत इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास देहुरोड लोहमार्ग रेल्वे पोलीस उपनिरीक्षक पी. टी. करदाळे यांना 965701973 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.