Monday, March 4, 2024
Homeपुणेमावळबोपोडी साहेब चषक २०२१"चे मानकरी 'कोविड१९' संघ..

बोपोडी साहेब चषक २०२१”चे मानकरी ‘कोविड१९’ संघ..

मावळ दि.25: महाविकास आघाडी बोपोडी आयोजित “साहेब चषक २०२१” भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे अंतिम सामने रविवार दि.24 रोजी छत्रपती शिवाजी क्रीडांगण बोपोडी येथे अत्यंत जल्लोशपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी बोपोडी भागातील १५०० युवक व क्रीडा रसिकांनी अंतिम सामन्याचा लाभ घेतला.

अंतिम सामना “कोविड१९ व धाबळ बॉईज” या संघांमध्ये झाला व त्यामध्ये “साहेब चषक २०२१”चे मानकरी ‘कोविड१९’ ह्या संघाने प्रथम पारितोषिक 11001 व चषक पटकवला, द्वितीय पारितोषिक 7001 व चषक हे धाबळ बॉईज या संघाने मिळविले असून, तृतीय क्रमांकाचे 3001व चषक हे पारितोषिक भापकर बॉईज ह्या संघाने मिळविले आहे.

सदर स्पर्धेचे आयोजन विजय जाधव ( वी. जे. एन. टी. सेल अध्यक्ष,राष्ट्रवादी कॉ. पुणे ),व अमोल उत्तम जाधव ( उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर ) यांनी केले असता. मुख्य संयोजक म्हणून प्रभात सुलगे ( सरचिटणीस राष्ट्रवादी कॉ. सामाजिक न्याय विभाग शिवाजीनगर ) यांनी भूमिका पार पाडली.

सर्व पारितोषिक वितरण समारंभावेळी प्रमुख उपस्थिती खडकीचे नगरसेवक मनीषजी आनंद, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष करण चढा, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा,माजी नगरसेवक कैलासदादा गायकवाड, भुषणजी साळवे, माजी स्वीकृत नगरसेवक करीम लाला शेख, विठ्ठल अरुडे, मयुरेश गायकवाड, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते इंदूबाई गायकवाड, कांता ढोणे, सुंदर ओव्हाळ, विमल खांडेकर, मनीषा ओव्हाळ, अरुणा चिमटे , कमल गायकवाड, सादिक शेख, युवक संघटक सचिव विक्की गायकवाड, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष कुणाल जाधव, बाबू दीक्षित, अनिकेत गायकवाड, फिरोज मुलाणी, युवक काँग्रेस काँग्रेस माजी अध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष अतुल गायकवाड, राष्ट्रवादी शिवाजीनगर सरचिटणीस अमित जावीर, संदीप गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन गायकवाड, अभि मोरे, अरुण गायकवाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page