बोरघाटातील देवदूतांना रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप….महामार्ग पोलिसांचा स्तुत्य उपक्रम ….

0
118

( खोपोली- दत्तात्रय शेडगे ) एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघाताच्या वेळी मदत करण्याऱ्या देवदूतांचा आज बोरघाट महामार्ग पोलिसांच्या वतीने रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करण्यात आले. एक्सप्रेसवेवरील बोरघाट क्षेत्र हे अवघड क्षेत्र असून या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात.

मात्र या अपघाताच्या वेळी महामार्ग पोलिसांच्या मदतीला येणारे क्रेन चालक, फिटर ,ग्रामस्थ यांची वेळोवेळी महत्वाची भूमिका असते याची दखल घेत आज बोरघाट महामार्ग पोलीस केंद्रांचे सहायक पोलिस निरीक्षक जगदिश परदेशी यांच्या हस्ते रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करण्यात आले.

जेणेकरून रात्री अपरात्रीच्या वेळी अपघातात मदत करताना त्यांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी या जॅकेटचा उपयोग होणार आहे एकूण 15 जणांना आज हे रिफ्लेक्टर जॅकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी बोरघाट पोलीस महामार्ग केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक जगदिश परदेशी यांच्यासह अनेक कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.