बोरघाटात अवघड वळणावर कार पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही..

0
113

खोपोली हुन लोणावळा कडे एर्टीगा कार जात असताना ती बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ अवघड वळणावर आली असता पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील कोणतेही जीवित हानी झाली नसून कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बोरघाटात भरधाव वेगात कार जात असताना ती शिंग्रोबा मंदिराजवळ अवघड वळणावर आली असताना चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली, या अपघातात कार मध्ये चार जण प्रवासी अडकले होते.


या अपघाताची माहिती बोरघाट पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल होत कार मधील अडकलेल्या प्रवाशाना बाहेर काढण्यात आले.