बोरघाटात ट्रकने दिली डोंगराला धडक… दोघांचा जागीच मृत्यू एक जन गंभीर जखमी…

0
180

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.


खोपोली दि.10: मुबंई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात तीव्र उतारावर खिंडीत ट्रकने डोंगराला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.


पुण्याहून मुबंई कडे माल घेऊन ट्रक बोरघाटातुन नो एंट्री मार्गे जात असताना खिंडी जवळील तीव्र उतारावर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ने खिंडीच्या डोंगराला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक मधील दोन जणांचा जागिच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.


ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात यावेळी महामार्ग पोलीस केंद्र, अपघात ग्रस्त बचाव पथक चे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत अडकलेल्याना बाहेर काढण्यात मदत केली. त्यातील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.