
(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
खालापूर मुबंई पुणे जुन्या बोरघाट महामार्गावरून नो एंट्री तुन ट्रक जात असताना त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला.
मात्र तेथे असलेल्या झाडावर ट्रक अडकल्याने दोन जणांचा जीव वाचला असून भीषण अपघात झाला. बोरघाटातून ट्रक नो एंट्री मार्गे खोपोली कडे येत असताना तो मेकॅनिक पॉइंड जवळील तीव्र उतारावर आला असताना चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याचे सुरक्षा कठडे तोडून दरीत कोसळला मात्र तेथे असलेल्या झाडावर हा ट्रक अडकल्याने मोठी दुर्घटना टळली, त्यामुळे ट्रक मधील दोन जणांचे जीव वाचले आहेत.