बोरघाटात ट्रक ने दिली पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक…

0
865


एक पोलीस किरकोळ जखमी,मात्र पोलिसांच्या गाडीचा चक्काचूर..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुंबई पुणे जुन्या माहामार्गावरील बोरघाटात दुपारी वाहन तपासणी साठी उभ्या असलेल्या ट्रक चा हँड ब्रेक न लागल्याने तो ट्रक पाठीमागे येऊन पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक देऊन गाडी घसरत गटारात नेऊन त्या गाडीवर ट्रक पडून भीषण अपघात झाला.
या अपघातात पोलीस हवालदार कोळंबे हे जखमी झाले असून ते बाल बाल बचावले आहेत, काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणी प्रमाणे आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस चौकीतील पोलिस हवालदार खाडे व कोळंबे यांना प्रत्यय आला, हे पोलीस खोलीत हुन बोरघाटातून आपल्या वॅगनआर कार मधून दस्तूरी कडे जात असताना ते खोपोली जवळ बोरघाटातुन लोणावळ्याच्या दिशेने विटा घेऊन ट्रक जात असताना घाटाच्या पायथ्याशी वाहन तपासणी साठी थांबला असता ट्रक चा हँड ब्रेक न लागल्याने तो ट्रक पाठीमागे येऊन उभ्या असलेल्या कार ला धडकला, व कार ला घसरत वीस फूट लांब नेऊन गटारात नेऊन ट्रक तिच्यावर पडून भीषण अपघात झाला.
या अपघातात कार मध्ये पोलीस कोळंबे हे अडकले असून त्यांना अथक प्रयत्ननंतर बाहेर काढण्यात आले, ते किरकोळ जखमी झाले आहेत मात्र कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कार चा चक्काचूर झाला आहे,या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघात ग्रस्त टीम चे सदस्य, देवदूत टीम व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतीने कार मध्ये अडकलेल्या पोलिसाला काढण्यात यश आले आहे.