Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबोरघाटात मिनीबस पलटी,चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावर बस झाली पटली..

बोरघाटात मिनीबस पलटी,चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावर बस झाली पटली..


7 प्रवासी जखमी, मोठी जीवित हानी टळली..

खोपोली-दत्तात्रय शेडगे

आज सकाळी पुण्याहून खोपोली कडे मिनीबस ही प्रवासी घेऊन जात असताना ती बोरघाटातुन नो एंट्री मार्गे खोपोली कडे जात असताना शिंग्रोबा मंदीराजवल खिंडीततील तीव्र उतारावर चालकाला बसवरील ताबा सुटल्याने बस घाटात पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील 7 जण किरकोळ जखमी झाले असून दैव बलवत्तर म्हणून बस रस्त्याच्या कडेला ही बस पलटी होऊन जागीच थांबली.
अन्यथा थोड्याच अंतरावर खोल दरीत कोसलून मोठी जीवित हानी घडली असती या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टीम चे सदस्य हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत बस मधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page