Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबोरघाटात हायवे मृत्युंजय दूत योजनेची सुरुवात..

बोरघाटात हायवे मृत्युंजय दूत योजनेची सुरुवात..

पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती..

खोपोली- दत्तात्रय शेडगे-

खोपोली.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलिस केंद्रात आज हायवे मृत्युंजय दूत योजनेची सुरुवात करून आज उदघाटन करण्यात आले.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात मात्र एखादा अपघात झाला तर अपघात ग्रस्त व्यक्तीला कसे उचलायचे याचे प्रात्यक्षिक पवना ट्रामा केअर टीमने करून दाखविले.महाराष्ट्र सरकारने सगळीकडे हायवे मृत्यूजय दूत योजनेचे जाहीर केली असुन तिचे आज अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य डॉ भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येणार आहे.

तिचे उदघाटन आज बोरघाट पोलीस केंद्रात राबविण्यात आले.बोरघाट पोलीस केंद्र यांच्या वतीने आठ टीम करण्यात असून यात फिटर मकेनिक टीम,टोविंग हेईकल,टीम, ग्रामस्थ टीम,सेवाभावी संस्था, आयआरबी अफकोण ,हॉटेल पेट्रोल पंप टीम, अंबुलन्स टीम, पत्रकार आणि सोसिअल मेडिया टीम असे एकूण आठ टीम तयार करण्यात आली आहे.

जेणेकरुन अपघात घडल्यास यांच्या वतीने अपघात ग्रस्त व्यक्तीला तात्काळ उपचार मिळून जखमींचे प्राण वाचेल. यावेळी उपविभागीय अधिकारी खालापूर संजय शुक्ला, पनवेल महामार्ग पोलीस केंद्राचे सुदाम पाचोरकर ,खोपोली पोलीस स्टेशनचे अस्वर बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, अपघात ग्रस्त टीमचे गुरुनाथ साठीलकर,आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस टीम ,पवना ट्रामा केअर सेंटरची टीम, क्रेन चालक, फिटर ,पोलीस हवालदार बोंबे, वर्तक, ग्रामस्थ नितीन सुतक, रमाकांत सुतक आदीसह अनेक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page