खोपोली-दत्तात्रय शेडगे
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज पासून बोरघाट महामार्ग पोलिसांनी ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज ही मोहीम चालू केली असून आज एक्सप्रेस वेवर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या व बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली, ही मोहीम 18 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
बोरघाट महामार्ग पोलीस केंद्र अंतर्गत ही मोहीम आज पासून बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आज राबविण्यात आली, यावेळी बेशिस्त वाहन चालकांना मार्गदर्शन करून संबंधित ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले.
यावेळीं एक्सप्रेस वेवर नशा करून कोणीही गाडी चालवू नये, वाहन चालवताना सेफ्टी लेनचा ववापर करावा, निषकळजी पणाने वाहन चालवू नये, व सुरक्षित अंतर ठेवावे,दुचाकीस्वरांनी हेल्मेटचा वापर करावा, अतिवेगाने वाहने चालवू नये, या सूचनांचे मार्गदर्शन वाहन चालकांना करण्यात आले.