खोपोली- दत्तात्रय शेडगे
सद्य सगळी कडे ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान जोरदार चालू असून त्याच अनुषंगाने बोरघाट पोलिस केंद्राच्या वतीने बोरघाटातील अंडा पॉइंड जवळ दुचाकी वाहनचालकांना थांबवुन त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली.बोरघाट पोलीस केंद्राचे पीएसआय महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी अतिवेगाने वाहन चालवू नये, दारू पिऊन किंवा नशा करून वाहन चालवू नये, रस्त्यावर धोकादायक ठिकाणी वाहन पार्किंग करू नये, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करावा झ चारचाकी वाहन चालविताना समोर पाहणाऱ्या प्रवाशी व चालक यांनी सीटबेल्ड चा वापर करावा, थकलेले असाल किंवा झोप येत असेल तर वाहन चालवू नये, वाहन चालवताना सतर्क राहून समोरील रस्त्यावर लक्ष ठेवून वाहन चालवावे, वाहन चालवताना धोकादायक रित्या ओव्हरटेक करू नये.
अपघातग्रस्त जखमींना जलदरीत्या औषध व उपचार मिळण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अंबुलन्स वाहनांना अडथळा करू नये, या नियमांचे महत्व आज बोरघाटात अंडा पॉईंट जवळ वाहन चालकांना पटवून देण्यात आले.
यावेळी बोरघाट पोलीस केंद्राचे पीएसआय महेश चव्हाण पोलीस हवालदार, आदीसह अनेक वाहन चालक उपस्थित होते.