बोरघाट पोलिसांनी श्रमदानातून भरले पार्किंग मधील खड्डे, वाहनचालकांत समाधान..

0
225

खोपोली-दत्तात्रय शेडगे

बोरघाट पोलिसांनी श्रमदानातून पार्किंग मधील पडलेले खड्डे भरले असून यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरील दस्तुरी येथे असलेल्या बोरघाट पोलीस चौकीच्या पार्किंग मध्ये मोठं मोठं खड्डे पडले होते.

यामुळे वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.याची दखल घेत आज बोरघाट पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून स्वःत खड्डे भरून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे,त्यांनी भरलेल्या खड्यामुळे वाहन चालक व ग्रामस्थांनी समाधानाची भावना व्यक्त केली आहे.


यावेळी बोरघाट पोलीस स्टेशनचे एपीआय जागिदश परदेशी, सहाय्यक फौजदार भोईर, पोलीस हवालदार शिंदे, लाड, ठाकूर, चव्हाण, पाटील, मोहिते म्हात्रे, कदम साठे आदी उपस्थित होते.