Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडबोरघाट महामार्ग पोलीस केंद्रात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात..

बोरघाट महामार्ग पोलीस केंद्रात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात..

३२ व्या अभियानाला आजपासून सुरुवात..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाटात असलेल्या महामार्ग पोलिस केंद्र यांच्या वतीने आज रस्ता सुरक्षा अभियानाला आज पासून सुरुवात करण्यात आली.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर नेहमीच बोरघाटात अपघात होत असून हा भाग अपघात क्षेत्र म्हणून ओळखला जातो, हे अपघात रोखण्यासाठी सरकार कडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, त्याचप्रमाणे आज ३२ वे रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आले, हे अभियान १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.


या अभियानात एक्सप्रेस वेवर वारंवार होणारे अपघात कमी कसे होतील याचे महत्त्व वाहन चालकांना पटवून देणे, वाहन चालकांकडून होणारी लेन कटींग, वाहनाची वेग मर्यादा यावर आजपासून नियंत्रण ठेवून अपघात रोखण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे.


यावेळी वाहतूक महाराष्ट्र पोलीस पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर,सहायक पोलिस निरीक्षक जगदिश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर ,रामदास शेंडे, मनसे माजी रायगड जिल्हाध्यक्ष मनीष खवले, नगरसेवक किशोर पानसरे, अपघात ग्रस्त टीमचे गुरुनाथ साठीलकर, रासप माजी जिल्हाध्यक्ष बबन शेडगे,सहज सेवा संस्थेचे डॉ शेखर जांभळे, पोलीस हवालदार प्रशांत बोंबे,दोरे, पाटील, वर्तक, कोंडे, जाधव, ठाकूर, मोहिते, मेटकरी, पिसपुलवार, वेळे, मोरे, मात्रे,लाबोटे,शेळके, गावंड, शिंदे, लाड, कोळंबे, ठाकूर झ चव्हाण, थले,भवरी, हानीम करंजीकर, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page