बोरघाट येथे झालेल्या ट्रकच्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू….

0
33

खोपोली (दत्तात्रय शेडगे)दि.3:मुबंई पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात ट्रकच्या ब्रेक मध्ये बॉटल अडकल्याने अपघात होऊन ट्रक ने दिली कठड्याला जोरदार धडक त्यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे.


मुबंई पुणे जुन्या महामार्गाने लोणावळ्याहुन खोपोलीच्या दिशेने ट्रक नो एंट्री मार्गे अंडा पॉईंट जवळील वळणावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने जवळील कठड्याला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक मधील चालक जागीच ठार झाला आहे.