Monday, November 11, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" बौद्ध धम्म विरुद्ध ब्राम्हणी धर्म " या देशाची मूळ लढाई आहे...

” बौद्ध धम्म विरुद्ध ब्राम्हणी धर्म ” या देशाची मूळ लढाई आहे ,असे बाबासाहेब सांगतात-राजरत्न आंबेडकर..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) या देशाची मूळ लढाई बौद्ध धम्म विरुद्ध ब्राम्हणी धर्म अशी आहे , असे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे . असे प्रखर मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी कर्जत पोलीस मैदान येथे कर्जत तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या ” भीम महोत्सव – २०२४ ” महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी या भीम महोत्सवात तथागत भगवान गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन प्रख्यात व्याख्याते राजरत्न आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी विचारपिठावर भीम महोत्सव – २०२४ चे अध्यक्ष ऍड. शैलेश पवार व सर्व कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे शाल – पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी ” भारतीय संविधान ” या विषयावर म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान मसुदा समितीवर निवडून जाण्यासाठी खूप त्रास झाला . बाबासाहेब मुंबई प्रांतातून निवडणूक लढणार हे समजल्यावर त्यावेळचे काँग्रेसच्या नेत्यांनी बाबासाहेबांना सांगितले की , मसुदा समितीवर तुम्ही निवडून कसे जाणार ? आम्ही दरवाजे काय , खिडक्या पण बंद केल्यात , म्हणून बाबासाहेब पश्चिम बंगाल येथे उभे राहून निवडून आले . सन १९४६ ला संविधानावर कामकाज सुरू झाल्यावर अनेकांनी संविधान धर्मावर आधारित असावी असे मत व्यक्त केले होते , मात्र बाबासाहेबांनी सांगितले की , आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक रहातात , म्हणून धर्म निरपेक्ष अशी संविधान निर्मिती व्हावी , म्हणूनच विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर त्यावेळी बंदी आणली , यावर त्यांनी प्रकाश टाकला . व २ वर्ष ११ महिने १८ दिवसांत बाबासाहेबांनी संविधान लिहिले . संपूर्ण पृथ्वीवर एकच संविधान राबवायचे असेल तर ते ” भारतीय संविधान ” योग्यच आहे , असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते . असे गौरोद्गार त्यांनी काढले . या देशात साडे बाराशे वर्षे राज्य केलेली मनुस्मृती पुन्हा आणायची असल्यानेच संविधान हटविण्याचा संविधान द्वेष्टे प्रयत्न करतात , या मनुस्मृतीत आपल्या आजपर्यंत १५ पिढ्या राबविल्या असल्याचे , देखील त्यांनी सांगितले . आता कुठे भारतीय संविधानाला , ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत , या संविधानाने सर्व भारतीयांना स्वातंत्र्य – समता – बंधुता – न्याय तसेच हजारो अधिकार महिलांना दिले . मात्र हे अधिकार आपणास लगेच मिळाले का ? ते ही राबविण्यात व आपणास समजण्यात १० वर्षे गेले . आपली एक पिढी शासकीय नोकरीत गेली , आपली आर्थिक स्थिती सुधारते म्हणून आता सरकारी नोकऱ्याच बंद केल्या असल्याचे निर्मला सीतारामन या अर्थमंत्री यांनी सांगितले आहे . राजगृह हे पुस्तकांसाठी घर बांधले , ते महामानव एक पुस्तक जाळतात , ज्या मनूच्या व्यवस्थेने त्यांना गाडीत बसण्याचा अधिकार हिरावून घेतला व घाण चीखलयुक्त पाणी पिण्यास लावले , ती व्यवस्था त्यांनी बदलून टाकली , आणि हे संविधांनमुळे घडवू शकले.

आज देशात शिक्षणासाठी नाही तर धर्मासाठी नागरिक भांडत आहेत , याचा खेद त्यांनी व्यक्त केला . बीडमध्ये पंकजा मुंडे म्हणतात की , ” अब की बार ४०० पार ” संविधान हटविण्यासाठी गरजेचे आहेत , पण त्यांना माहित नाही मनूस्मृती आली तर तुम्हाला कशी वागणूक मिळेल , ते मनुस्मृती वाचल्यावर समजेल , असे खडे बोल त्यांनी सुनावले . बाबासाहेब म्हणाले होते , की संविधान राबविणारे हात तुमचे नाहीत , म्हणून तुमचा आवाज १३८ देश बौद्धांचे आहेत , ते ऐकतील व तुमच्यासाठी धावून येतील , आपली अर्थ व्यवस्था दुसऱ्यांच्या ताब्यात आहेत , ” कोरोना काळात ” विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली नाही तर २१०० कोटी रुपये देशाला तोटा झाला.
यावर त्यांनी प्रकाश टाकला . तर ३६४ दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांनीच बाबासाहेबांची जयंती साजरी करावी , असा कानमंत्र देखील त्यांनी उपस्थितांना दिला . देशात सर्वत्र माणसे कामकाज करतात , तर या देशाचे कामकाज करणाऱ्यांना निवडून देण्यासाठी ई व्हीं एम मशीन का ? असा सवाल उपस्थित करत , ” ई व्हि एम मशीन हटाव ” हि मोहीम देशव्यापी राबवून मशिनला हद्दपार करा , असे संतप्त मत व्यक्त करत मोलाचा सल्ला त्यांनी सर्वाँना दिला.

यानंतर प्रबोधन भीम गिते – राहुल अन्वीकर ( प्रसिद्ध कवी / गायक / प्रबोधनकार ) यांचा कार्यक्रम झाला . या भीम महोत्सवात मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव , महिला वर्ग , बहुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश गायकवाड यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page