Monday, April 15, 2024
Homeपुणेलोणावळाबौध्द जनसेवा संघ व रमामाता महिला मंडळ सिद्धार्थ नगर आयोजित रक्तदान शिबीर...

बौध्द जनसेवा संघ व रमामाता महिला मंडळ सिद्धार्थ नगर आयोजित रक्तदान शिबीर संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बौध्द जनसेवा संघ व रमामाता महिला मंडळ सिद्धार्थ नगर आयोजित रक्तदान शिबिरात 20 रक्त दात्यांनी रक्तदान केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौध्द जनसेवा संघ सिद्धार्थ नगर व रमामाता महिला मंडळ सिद्धार्थ नगर यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक वंदना घेत अभिवादन करण्यात आले. तसेच महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ नगर येथील जेतवन बुद्ध विहारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरा निमित्त लोणावळा शहर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली तसेच शहरातील तब्बल वीस रक्त दात्यांनी रक्तदान केले. यावेळी आयोजकांकडून रक्त दात्त्यांना प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.
तर स्वास्तिक ब्लड सेंटर कामोठे आणि श्रद्धा ब्लड स्टोरेज लोणावळा यांच्या टीमचे डॉ. अमोल वाबणे, हर्षदा काकडे, निकिता कुंजीर, सिदराया हेगळे, समर्थ पाटील, संगमेश शिलवंत, विकास कांबळे, सचिन भिसे, सागर पाटील, आशिफ पटेल आदी टीमने रक्त संकलन करत सहकार्य केले.
यावेळी बौध्द जनसेवा संघाचे अध्यक्ष विजय जाधव, सुनील यादव, संजय अडसूळे, प्रवीण कांबळे अन्य कार्यकर्ते तसेच रामामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषा जाधव, जयंती उत्सव अध्यक्षा 2022 श्वेता सोनवणे,भारती जाधव, समीक्षा कांबळे, सुजाता चौरे, जागृती कांबळे, पल्लवी अक्षय कांबळे आदिनी शिबीर यशस्वी होण्याकरिता विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page