if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी): मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत हद्दीत रात्रीच्या वेळी ट्रक अडवून चालकांची लुटमार करणाऱ्या तीन आरोपीना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.
याबाबत गौतम रंगनाथ अवधूत ( वय 53, व्यावसाय ड्रायव्हर,रा. सिम्बॉयसिस कॉलेजच्या मागे विमान नगर पुणे ) यांनी कामशेत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.याप्रकरणी शुभम दत्ता होजगे ( वय 20 ), धीरज लहू कडू (वय 18) व प्रथमेश जितेंद्र कालेकर (वय 18) तिघे राहणार पवना नगर, ता. मावळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं.314/2023 भादवी कलम 394,427,34 असे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखे कडून मिळालेल्या माहिती नुसार यातील फिर्यादी हे दिनांक 20/10/2023 रोजी रात्री 02:15 वा चे सुमारास बौर गावच्या हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर मुंबई लेनवर चढावर किलो मीटर नंबर 73/200 जवळ, तीन अज्ञात इसमांनी ट्रक क्रमांक एम.एच.12 यु.एम.8227 हा रस्त्यात अडवून ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारून नुकसान करून गाडीमध्ये चढून तक्रारदार यांना दगडाने डोक्यात मारून दुखापत केली.तसेच तक्रारदार यांचा मुलगा गौरव याला कानाखाली मारून गाडी थांबवून तक्रारदार यांच्या ताब्यातील 4500 रु. रोख रक्कम,4000 रु. किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, 4500 रु. किमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 13000 रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरी करून चोरून नेला होता .गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमला सुचना दिल्या.सदर गुन्ह्याचा कौशल्य पूर्वक तांत्रीक दृष्ट्या व गोपणीय बातमीदाराच्या मदतीने तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला असून यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (IPS) सत्यसाई कार्तीक,तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नेताजी गंधारे,पोसई प्रदीप चौधरी,सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे ,पो.हवा.राजु मोमीन , पो.ना. तुषार भोईटे ,पो.कॉ प्राण येवले यांच्या पथकाने दमदार कारवाई केली आहे.