Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडब्रेकिंग मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर बस ने दिली कंटेनरला जोरदार धडक एक...

ब्रेकिंग मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर बस ने दिली कंटेनरला जोरदार धडक एक जण गंभीर ,तर काही किरकोळ जखमी..

खोपोली (दत्तात्रय शेडगे)
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्या पासुन 2 किलोमीटर अंतरावर एका आराम बसने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बस मधील एक जण गंभीर जखमी झाला आहेत.

तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याकडून मुबंईकडे प्रवासी घेऊन बस जात असताना ती आडोशी गावाजवळ आली असता बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली, यात बस मधील एक जण गंभीर जखमी झाला असुन काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.


या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, सेव्ह लाईफ, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, आणि अपघात ग्रस्तटीम चे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य करीत आहेत, हा अपघात घडताच पोलीस अधिकारी संदेश नाईक यांनीही आपल्या सहकार्यांसमवेत मदत केली, मात्र सुदैवाने मोठी हानी टळली.

- Advertisment -