Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडब्लास्टिंगमुळे नुकसानीची भरपाई देण्यास कर्जत तहसीलदार यांच्या देखरेखीखाली रेल्वे प्रशासन राजी…

ब्लास्टिंगमुळे नुकसानीची भरपाई देण्यास कर्जत तहसीलदार यांच्या देखरेखीखाली रेल्वे प्रशासन राजी…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) वरिष्ठ पातळीवरून कर्जत तहसीलदार डॉ . शीतल रसाळ यांना १५ ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्य दिनी नागरिकांना योग्य उपाय काढून , न्याय देवून उपोषणापासून परावृत्त करा , असे आदेश असतानाही कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत हद्दीत ठेकेदार करत असलेल्या रेल्वे बोगद्याच्या ब्लास्टिंगमुळे हालीवली – किरवली ग्रामस्थ व आदिवासी वाडीला इरसाल वाडी सारखी मानवी दुर्घटना होवू शकते याची चेतावणी देवूनहि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात हालिवली सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे व ग्रामस्थ यांनी साखळी उपोषनाचा पवित्रा घेतला होता . तर आजपर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास कर्जत तहसीलदार यांच्या देखरेखीखाली ठेकेदार व रेल्वे प्रशासन राजी होत नसल्याने , घरांचे नुकसान तर झाले आहे.
म्हणून पंचनामे पण केले , मात्र शासनाची मुजोरी काय तर भरपाई देण्यास दिरंगाई ! पंचनामे केले , मग ते कुठे गेले , अद्यापी भरपाई का नाही ? याचे उत्तर कर्जत तहसीलदार यांचे कडे नाही , भरपाई देणार की नाही , याचे उत्तर तहसीलदार यांच्याकडे नाही , रेल्वे ठेकेदार नुकसान देण्यास राजी होत नाही , त्याला आदेश देण्याची हिम्मत कर्जत प्रांत अधिकारी अजित नैराळे व तहसीलदार शीतल रसाळ यांच्याकडे नाही , नागरिकांचे आरोप असे आहेत की , ज्या दिवशी सर्वांसमक्ष ब्लास्टिंग करतात त्यावेळी त्याची तीव्रता कमी असते , मात्र इतर वेळी ती मर्यादेपेक्षा जास्त असल्यानेच आमच्या घरांचे नुकसान झाले आहे ना ? याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या मा. रायगड जिल्हाधिकारी , कर्जत प्रांत अधिकारी व कर्जत तहसीलदार यांचे लक्ष वेधण्यासाठी व प्रशासनाला नमते करण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने व तमाम कर्जतकरांच्या सहानुभूतीने हालीवली ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांनी १५ दिवस अगोदर चेतावणी देवूनही मागण्या मान्य न करणाऱ्या ” मुजोर प्रशासनाविरोधात ” सरपंच सौ. प्रमिला बोराडे या नारी शक्तीने लढा देण्याचे इशारा देवूनही न जुमाननाऱ्या ” मुजोर शक्ती विरोधात ” दंड थोपटत देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी तीन दिवस साखळी उपोषण व नंतर मागण्या जुमानल्या नाहीत तर प्रशासनाला सुतासारखे सरळ करण्यासाठी आमरण उपोषण , असा मार्ग सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडला होता . मात्र प्रशासनाने ” आपण चुकतोय ” हे मान्य करत अखेर नमते घेवून ब्लास्टिंगमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच ग्रामस्थांना देण्याचे कबूल केले.
व त्यानंतरच हे उपोषण तात्पुरते स्थगित करून , झालेल्या निर्णयाला बगल दिल्यास व नुकसान भरपाई लवकरच न दिल्यास रेल्वे प्रशासन व कर्जत तहसीलदार यांच्या विरोधात पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल , असा इशारा हालीवली ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांनी देवून १५ ऑगस्ट रोजी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोडण्यात आले.

यावर कर्जत तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रात मनीष कुमार, असिस्टंट इंजिनीयर – प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई यांनी दि. १४/०८/२०२३ रोजी कळविण्याप्रमाणे दि. १६/०८/२०२३ रोजी ब्लास्टिंगमुळे धोका पोहचत असलेल्या हालीवली व किरवली मधील संभाव्य घटनास्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी करण्यात येणार आहे , तसेच मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई यांनी दि. १५/०८/२०२३ रोजी पत्रामध्ये नमुद केल्याप्रमाणे हालीवली व किरवली हद्दीतील ग्रामस्थांनी निवेदनात नमुद केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रेल्वे प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या ब्लास्टींगमुळे घरांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात IIT, VIII किवा त्यासमक्ष नामांकीत संस्थेद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
रेल्वेच्या सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेनंतर व या कार्यालयाकडून बाधीत ग्रामस्थांच्या नुकसान झालेल्या घराच्या यादीवर लवकरात लवकर शासनाच्या प्रचलीत नियम व अटीशर्तीप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच उर्वरीत शिल्लक राहिलेले व भविष्यात बाधित होणारे घरांचे पंचनामे करण्यात येतील , असे कार्यकारी दंडाधिकारी तथा कर्जत तहसीलदार यांनी नमूद केले आहे.

हालीवली – किरवली गाव व आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांना बोगदयाच्या ब्लास्टिंगमुळे झालेली नुकसानीची भरपाई मिळावी , यासाठी देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी जे उपोषण सुरू केले होते ते १६ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी यशस्वी झाले आहे . हे उपोषण यशस्वी होण्यासाठी हालीवली , किरवली गावातील अनेक ग्रामस्थ, पत्रकार बंधु , वकीलबंधु , आप्तस्वकीय , मैत्रीणी अनेक सामाजिक संस्था , शैक्षणिक , प्रशासकीय , राजकीय , क्षेत्रातील व्यक्ती , राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन , फोन , मेसेज इत्यादीद्वारे आमचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आम्हाला जी मदत केली व आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले , त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार असे मत सौ.प्रमिला सुरेश बोराडे थेट सरपंच ग्रा‌मपंचायत हालीवली यांनी व्यक्त केले आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page