Tuesday, May 28, 2024
Homeपुणेतळेगावभरधाव टँकर च्या धडकेने भंडारा येथे 33 वर्षीय दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू…

भरधाव टँकर च्या धडकेने भंडारा येथे 33 वर्षीय दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू…

तळेगाव(प्रतिनिधी): भरधाव टँकरच्या धडकेने 33 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.10 रोजी सकाळी 9:00 च्या सुमारास भंडारा डोंगर पायथ्याजवळ घडली.
संतोष दादाराव सुरवाडे (वय 33, रा. विद्याविहार कॉलनी, तळेगाव दाभाडे, मूळ राहणार साळशिंगी, ता. बोदवड, जि. जळगाव ) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक रामनारायण रतन यादव( रा. साईश्रद्धा नगर, पिसवली, कल्याण, जि. ठाणे, मूळ गाव सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) यास एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा डोंगर पायथ्याशी शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. एका भरधाव टँकरची धडक बसल्याने संतोष सुरवाडे हा 33 वर्षी तरुण जागीच ठार झाला.शुक्रवारी भंडारा डोंगर पायथ्याजवळील काळभोर पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. सदर टँकर हा तळेगावकडून चाकणच्या दिशेने भरधाव वेगात चालला होता.त्यावेळी सदर दुचाकीस्वाराला त्याची पाठीमागून जोरात धडक बसली. टँकर चालक रामनारायण यादव याला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. पी. अहिरे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page