भविष्यात एकही मुल कुपोषित राहणार नाही यासाठी सर्वतो प्रयत्न करणार – आमदार महेंद्रशेट थोरवे.

0
97


कर्जतमधील कुपोषित मुलांना पोषण आहार वाटप….

भिसेगाव – कर्जत/ सुभाष सोनावणे

कर्जत – खालापूर हा मतदारसंघ आदिवासी बहुल भाग असुन ईतर तालुक्याच्या तुलनेत कर्जत खालापुर मध्ये कुपोषणाची समस्या तीव्र आहे . शासनाच्या विविध विभागासह स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने प्रयत्न करुन भविष्यात मतदारसंघ कुपोषणमुक्त करणार असल्याची माहिती आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी दिली , कडाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात आयोजित कुपोषित मुलांना आहार वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई येथील प्ले अँन्ड शाइन फाउंडेशन व कर्जत तालूक्यातील कम्युनिटी ऍक्शन फॉर न्युट्रीशन प्रकल्पाच्या वतीने कर्जत तालुक्यातील तिव्र कुपोषित श्रेणीतील तीस मुलांना अंडी व पोषण आहार असलेल्या हँपिनेस बॉक्सचे वाटप आमदार महेंद्रशेट थोरवे यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालाजी पूरी ,तालूका आरोग्य अधिकारी डॉ.सि.के .मोरे ,कडाव ग्रा .पं. चे माजी संरपच सुदाम पवाळी ,एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर , प्ले अँन्ड शाइन फाउंडेशनचे सार्थक वाणी , कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे ,पंचायत समिती विस्तार अधिकारी अमित काळे, दिशा केंद्राचे अशोक जंगले आदि मान्यवर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार महेंद्रशेट थोरवे पुढे म्हणाले की , कोरोना संसर्ग कालावधीत अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर यांनी स्थानिक पातळीवर ज्या प्रकारे मेहनत घेऊन कोविड – १९ चा प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न महिला बालविकास ,आरोग्य विभाग ,आदिवासी विकास विभाग व स्वयंसेवी संस्थामध्ये समन्वय करून तालुक्यातील कुपोषण भविष्यात कमी करावे ,या कामी काहीही मदत लागली तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन पुढाकार घेईल .एकशे तीस मुले आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने दत्तक घेतलेची घोषणा ,यावेळी आमदार थोरवे यानी केली.

कर्जत व खालापुर तालुक्यातील आदिवासी उपाययोजना व माडा मिनी माडा क्षेत्रातील अगंणवाड्यामध्ये सुरू असलेल्या शासनाच्या भारतरत्न डॉ. एपिजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा निधी नियमीत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे ,अगंणवाडी सेविकांचे मानधन वाढविणे ,आरोग्य व महिला बालविकास विभागातील रिक्त पदे भरणेसाठी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचे थोरवे यानी सागितले.

कर्जत न.प.चे नगरसेवक संकेत भासे यांनी प्रत्येक मुलास तीस अंडी उपलब्ध करून दिले तर प्ले अँन्ड शाईन फाउंडेशन च्या वतीने चिक्की ,राजगिरा लाडू ,दूध, केळी याचा समावेश असलेल्या हँपिनेस बॉक्स तीस मुलांसाठी उपलब्ध करून दिले आहेत .तालूक्यातील 29 अगंणवाड्या मध्ये कँन प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या आहाराचे वाटप केले .कँन प्रकल्पाचे कार्यकर्ते रवी भोइ ,संतोष देशमूख ,जयराम पारधी व विमल देशमुख यांनी सहकार्य केले.