
लोणावळा ( प्रतिनिधी ) : रस्त्यावर उभी केलेली दुचाकी पळवून नेणाऱ्या चोरट्याच्या अवघ्या दोन दिवसातच स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा शहर गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळत भांगरवाडी येथून चोरी केलेली दुचाकी पल्सर 220 हस्तगत करून मालकाच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
मंगळवार दि . 22 रोजी रात्री 1 वा.च्या सुमारास लोणावळा भांगरवाडी येथे रस्त्यावर उभी केलेली पल्सर 220 क्र. MH 14 EQ 7050 ही दुचाकी अवघ्या काही वेळातच चोरट्याने पळवून नेल्याची फिर्याद दि.22 रोजी शुभम प्रताप अवघडे ( रा . आगवाला चाळ , लोणावळा , व्यवसाय नोकरी ) यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा द वी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना आरोपी शुभम अनिल कुंभार (वय 24, रा. कलगुडे चाळ, भोंडे हायस्कूल च्या मागे, भांगरवाडी, लोणावळा ) यास दुचाकी सह दि.24 रोजी सायंकाळी 6:00 वा. च्या सुमारास खंडाळा येथील नाझर टर्न येथून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण हे गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दि.24 रोजी सायंकाळी 6:00 वा. च्या सुमारास आरोपीला मुंबई पुणे महामार्ग खंडाळा येथील नाझर टर्न येथून दुचाकी सह ताब्यात घेण्यात आले.सदर दुचाकी मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली असून मा. वडगांव मावळ न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कस्टडी देऊन जामिनावर मुक्तता केली आहे.