Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभाजपच्या क्रोधमोर्चाच्या इशाऱ्याने कोंदीवडे रस्त्याच्या कामाला सुरुवात !

भाजपच्या क्रोधमोर्चाच्या इशाऱ्याने कोंदीवडे रस्त्याच्या कामाला सुरुवात !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली असल्याने नागरिकांना यावरून प्रवास करताना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत.वासर्याच्या खोंड्यात जाणारा प्रमुख कोंदीवडे रस्ता हा तातडीने सुधारावा , अन्यथा आपल्या कार्यालयावर क्रोध मोर्चा आयोजित केला जाईल ,व रास्ता रोको करून चक्का जाम केला जाईल,असा ईशारा भारतीय जनता पक्ष ,युवा कर्जत तालुक्याच्या वतीने देण्यात आला होता.

या पत्राची तातडीने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने कामाला सुरुवात केली.कोंदीवडे हा रस्ता दहिवली पासूनच अतिशय खराब झाला असून नागरिकांना जाण्यायेण्यासाठी अतोनात कष्ट होतात , याबाबतीत अनेकदा मोटार सायकल स्लीप होऊन एक्सिडंट झाले आहेत , म्हणून हा रस्ता त्वरित झाला पाहिजे , अशी आग्रही मागणी भाजप युवा मोर्चा च्या वतीने केली होती.

परंतु त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग प्रतिसाद देत नव्हता त्यामुळे काल युवामोर्चा च्या वतीने कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख आणि कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम चालू झाले नाही तर १५ ऑगस्ट २०२१ या स्वातंत्र्यदिनी पक्षाच्या वतीने नागरिकांना होणाऱ्या त्रासाला न्याय देण्यासाठी क्रोध मोर्चा आणून रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन केले जाईल , असा इशारा दिला होता.

दिलेल्या क्रोध मोर्चाच्या इशाऱ्याला प्रशासकीय व्यवस्थेने गंभीर दखल घेऊन आज पासून कोंदीवडे या रस्त्याचे काम सुरू झाले.या प्रसंगी युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील , शहर अध्यक्ष मयुर शितोळे , सरचिटणीस मनोज रावळ उपाध्यक्ष सार्थक घरलुटे , चिटणीस सर्वेश गोगटे , विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिषेक तिवारी , आणि युवा मोर्चाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे , तालुका सरचिटणीस राजेश भगत ,कर्जत शहराध्यक्ष बळवंत घुमरे , सरचिटणीस प्रकाश पालकर यांनी त्यांना सहकार्य केले होते . सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम तातडीने चालू केल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे , असे मत भाजप कोकण संघटक सुनील गोगटे यांनी व्यक्त केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page