Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाभाजपच्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिक व विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

भाजपच्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिक व विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहर भाजपाच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ व चालढकल कारभाराच्या विरोधात घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . यावेळी कामगार वर्ग , विद्यार्थी , जेष्ठ नागरिक यांनी अभियान ठिकाणी आवर्जून थांबून आपल्या स्वाक्षऱ्या केल्या.
लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील काही वर्षांपासून रखडले आहे . ते काम त्वरित मार्गी लावण्यात यावे . लोणावळा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुर्वीसारखा थांबा चालू करण्यात यावा , स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे परिसरात वेळोवेळी स्वच्छता अभियान राबवावे.
पुणे लोणावळा लोकलच्या सर्व सेवा पुर्ववत कराव्यात तसेच दुपारच्या सत्रात लोकल च्या फेऱ्या वाढवाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी लोणावळा शहर भाजपाच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल , माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , माजी नगरसेवक व भाजपा गटनेते देविदास कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत भांगरवाडी , नांगरगाव रेल्वे गेट क्रमांक 32 याठिकाणी गेटच्या दोन्ही बाजूला स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव , विशाल पाडाळे , राजाभाऊ खळदकर , अन्वर निंबर्गी, हर्षल होगले , अरुण लाड , शुभम मानकामे , अर्जुन पाठारे , दीपक कांबळे , सुरेश गायकवाड , अभय पारख , रुपेश नांदवटे , नंदू जोशी , परिजा भिल्लारे , विजया मराठे , श्रिया रहाळकर , आदिती होगले , सुप्रिया देशपांडे , बाबु संपत , शिवम चिकणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page