Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडभाजपा खालापूर तालुका अध्यक्षचा कोरोना मुळे मृत्यु..

भाजपा खालापूर तालुका अध्यक्षचा कोरोना मुळे मृत्यु..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

भारतीय जनता पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष मोरेश्वर (बापू) घारे यांचे आज पहाटे कोरोना मुळे निधन झाले आहे मागील दहा दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर डी वाय पाटील या रुग्णालयात मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू होते आज पहाटे त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने उपचारादरम्यान रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला

अत्यंत शांत संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता खालापूर तालुका नव्हे तर सर्वदूर पसरली होती तालुक्यातील एक अभ्यासू व जेष्ठ नेता हरपल्याने खालापूर तालुक्यातील त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे..

- Advertisment -