Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभाजपा खोपोली शहराच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

भाजपा खोपोली शहराच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

खोपोली (दत्तात्रय शेडगे )केंद्रात भाजप सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याने भारतीय जनता पक्ष खोपोली शहराच्या वतीने वतीने गोरगरीब आदिवासी बांधवाना अन्नधान्यसह मास्क व सेनीटायझरचे वाटप करण्यात आले.

केंद्रात भाजप सरकारला 31 मे ला सात वर्षे पूर्ण झाल्याने आज खोपोली शहर भाजपाच्या वतीने आज गगनगिरी आदिवासी वाडी व मोगलवाडी आदिवासी येथील गोर गरीब गरजुना अन्नधान्य व मास्क व सेनीटायझरचे वाटप करण्यात आले यावेळी 50 कुटूंबानी याचा लाभ घेतला हा उपक्रम भाजपा खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

यावेळीं भाजपा खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंद नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, दिलीप पवार, चंद्रप्पा अनिवार, राकेश रेट्रेकर, चिटणीस स्वाती बिवरे, गोपाल बावसकर, सुनीता पाटणकर, संजय म्हात्रे, राहुल जाधव, राकेश दबके, कीर्ती ओसवाल, जिल्हा सदस्य विजय तेंडुलकर, स्नेहल सावंत, युवा मोर्चा प्रमुख अजय इंगुलकर, विकास खुरपुडे, पुनित तना, वाघ, श्याम करणसिंग, करण यादव झ आदीसह अनेक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page