Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाभाजपा लोणावळा शहर आयोजित चिमुकल्यांसाठी जादूचे प्रयोग व दुर्बीणीतून आकाश दर्शन…

भाजपा लोणावळा शहर आयोजित चिमुकल्यांसाठी जादूचे प्रयोग व दुर्बीणीतून आकाश दर्शन…

लोणावळा (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टी लोणावळा आयोजीत लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग व आकाश दर्शन कार्यक्रमास शहरातील चिमुकल्यांनी भली गर्दी केली.
लोणावळा शहर भाजप चे नेते माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व भाजपा चे लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या विद्यमाने लोणावळा परिसरातील लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग व मोठया दुर्बिणीच्या साहाय्याने आकाश दर्शनाचे नियोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास परिसरातील शेकडो बालकांनी उपस्थिती दाखवून फुल टु धमाल , मजा , मस्ती आणि जबरदस्त मनोरंजनाचा आनंद घेतला.तसेच माझे शहर स्वच्छ शहर, प्लास्टिक मुक्त शहर व झाडे लावा झाडे जगवा अशी शपथ यावेळी चिमुकल्यांनी घेतली.
लोणावळ्यातील इंद्रायणी गार्डन येथे शनिवार दि .5 नोव्हेंबर रोजी सायं.5 वा. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा शहर भाजपा अध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांसह लोणावळा शहर भाजपा कार्यकर्ते व महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page