Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभाजप कर्जत विधानसभा व रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा स्तुत्य उपक्रम !

भाजप कर्जत विधानसभा व रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा स्तुत्य उपक्रम !

आरोग्य तपासणी शिबीर घेवून जपली कर्जतकरांची सुरक्षा…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) नेहमीच कर्जतकर नागरिकांची अनेक आरोग्य शिबिरे घेवून आरोग्य सुदृढ रहाण्यासाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्ष , कर्जत विधानसभा व रा.स्व.संघ जनकल्याण समिती व प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शनि महाराज मंदिर सभागृहात आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते . यावेळी १४२ नागरिकांनी या शिबिरात तपासणी करून लाभ घेतला.

सदर शिबिराची सुरुवात ” भारतमातेच्या ” प्रतिमा पूजनाने झाली. शिबिरात रक्तातील ” हिमोग्लोबिन व साखरेचे ” प्रमाण तसेच हाडातील ” कँल्शियम ” तपासणी करण्यात आली. डॉ. किर्ती समुद्र यांनी मधुमेह रुग्ण , डॉ. स्मिता सोनी यांनी स्त्री रोग , डॉ. भक्ती यांनी शस्त्रक्रिया , डॉ. रेखांशु साईकर यांनी हाडांचे विकार व डॉ. अपेक्षा म्हात्रे यांनी सामान्य रुग्ण तपासणी केली . याप्रसंगी सर्वांना औषध वाटप करण्यात आले . या शिबिराचा १४२ कर्जतकर रुग्णांंनी लाभ घेतला.

यावेळी रुग्णालय प्रकल्प समिती सदस्य महेश मुद्रस , जनसंपर्क अधिकारी प्रसन्न खेडकर , परिचारिका कु.कविता कोळी , सौ.रसिका भोईर , अमृता म्हात्रे व आरोग्य वाहन चालक विनायक बाचकर , भाजप कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण भाऊ ठाकरे , संजय कराळे , किसान मोर्चाचे सुनील गोगटे , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री साईनाथ श्रीखंडे , जिल्हा बजरंग दल संयोजक विशाल जोशी , शहर अध्यक्ष विजय जिनगरे , जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे , तालुका चिटणीस सरस्वती चौधरी , उपाध्यक्ष स्नेहा गोगटे , गायत्री परांजपे , कर्जत महिला अध्यक्ष शर्वरी कांबळे , सूर्यकांत गुप्ता , मिनेश मसणे , अभिजित पटेल, विशाल कोकरे , राजेश ठाणगे , प्रवीण बोराडे , युवा मोर्चा अध्यक्ष कु. प्रज्ञेश खेडकर , सरचिटणीस कु. अभिषेक तिवारी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे , प्रियांश जैन , मनीष गुप्ता व इतर पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page