Monday, April 15, 2024
Homeपुणेवडगावभाजप चे रवींद्र बाळासाहेब म्हाळसकर यांची वडगांव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड…

भाजप चे रवींद्र बाळासाहेब म्हाळसकर यांची वडगांव नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड…

मावळ (प्रतिनिधी) : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे रवींद्र ऊर्फ संपत बाळासाहेब म्हाळसकर यांची शुक्रवार दि.13 रोजी निवड करण्यात आली.
भाजपचे स्वीकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांनी पक्षांतर्गत निर्णयाप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी जिल्हा प्रशासनाकडे रवींद्र म्हाळसकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पिठासीन अधिकारी तथा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ढोरे यांनी म्हाळसकर यांची निवड जाहीर केली.
सदर बैठकीस उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक प्रवीण चव्हाण, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, सुनीता भिलारे, दीपाली मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, निवडीनतंर भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते रवींद्र म्हाळसकर यांचा सत्कार करण्यात आला व वडगाव शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, माजी नगरसेवक विजय जाधव,शाम ढोरे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, प्रसाद पिंगळे, श्रीधर चव्हाण, शंकर भोंडवे आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page