Thursday, September 28, 2023
Homeपुणेमावळभाजप धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे वाटप…

भाजप धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे वाटप…

296 वी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी..

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
मावळ तालुका भाजपा धनगर समाज विकास परिषदेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 296 व्या जयंती साजरी करण्यात आली. लोहगड विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मालेवाडी धनगरवस्ती येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती साजरी करून प्रत्येक वस्तीवर अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील मालेवाडी, लोहगड घेरेवाडी, शिळीम, आपटी धामणदरा, उंबरवाडी वडेश्वर पठार, उकसांनं पठार, करंजगावं पठार या धनगर वस्तीवर प्रतिमा वाटप करण्यात आल्या,
यावेळी भारतीय जनता पार्टी मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, भाजपा संघटनमंत्री किरण वाक्ष्रे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्चीन्द्र केदारी, जितेंद्र बोत्रे, विकास लांबोरे, देवभाऊ गायकवाड, अमोल भेगडे, नामदेव शेडगे, वाघू कोकरे, सुमित्राताई जाधव, अश्विनी साठे ,सुजाता पडवळ, आनंता मरगळे,गंगाराम मरगले, धाऊ मरंगले, कोंडीबा मंगले, संतोष मरगले, कुंडलिक मरगले, भाऊ मरंगले, निलेश आखाडे विशाल गोरे आदीसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

- Advertisment -