Monday, March 4, 2024
Homeपुणेलोणावळाभाजी मार्केट जवळील पाणपोई तात्काळ दुरुस्त करून चालू करण्याबाबत लोणावळा नगरपरिषदेस निवेदन..

भाजी मार्केट जवळील पाणपोई तात्काळ दुरुस्त करून चालू करण्याबाबत लोणावळा नगरपरिषदेस निवेदन..

लोणावळा (प्रतिनिधी): नगरपालिका इमारती जवळ असणारी पाण्याची टाकी (पाणपोई) दुरूस्त व स्वच्छ करून पिण्याचे पाणी सुरु करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर प्रवक्ते फिरोज शेख यांच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना निवेदन देण्यात आले.
लोणावळा नगरपरिषद इमारती जवळ लोनपा आणि लायन्स क्लब ऑफ डायमंड यांच्या सहकार्याने भाजी मार्केट मध्ये येणाऱ्या वाटसरूसाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था झाली असून ती पाणपोई फक्त नावापुरतीच राहिली असून धूळ खात पडली आहे.या पाणपोईचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिक, भाजी व फळ विक्रेते, हमाल कामगार तसेच मार्केटला येणारी गोर-गरीब जनता यांना टाकीचा पाणी पिण्यासाठी उपयोग होत असतो.
सदर टाकीचे नळ व टाकी आतुन स्वच्छ करून उपयोगात आणावी व नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळेल अशी व्यवस्था करावी अशी विनंती निवेदनामार्फत करण्यात आली आहे.यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते फिरोज नजीर शेख व सामाजिक कार्यकर्ते सुहास शिंदे हे उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page