Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभात शेतीच्या नुकसाचे तातडीने पंचनामे करण्यासाठी खालापुर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार...

भात शेतीच्या नुकसाचे तातडीने पंचनामे करण्यासाठी खालापुर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन..

खोपोली(दत्तात्रय शेडगे)
गेल्या काही दिवसांपासून पावसाने आहाकार केल्यामुळे तालुक्यातील असलेली भात शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले होते.शेतामध्ये दोन ते तीन फुट पाणी जमा झाल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने भात लागवड केलेली वाहून गेली त्याच बरोबर शेतीचे असलेले बांध सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने वाहून सर्व माती शेतामध्ये आल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहे.

मात्र झालेल्या भात शेतीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे,यासाठी खालापुर येथिल तहसीलदार इरेश चप्पलवार यांना खालापूर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेले दहा दिवस पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी वर्गांचे तोंडचे पाणी पळाले होते.

दि. १८ जुलैै पासून ते २२ पर्यंत पावसाने सर्व शेतकरी वर्गांना मोठा धक्काच दिला.पावसाने मात्र कहर केला.भात शेतीचे मोठे नुकसान झाले.पाण्याचा प्रवाह ऐवढ्या तीव्रतेने होता की डोंगराळ भागातील माती शेतामध्ये आल्यामुळे भात शेती या मातीखाली गाडली गेली.त्याच बरोबर पावसाच्या पाण्याचा खूप तीव्रतेने असल्यामुळे शेतात केलेली लागवड पुर्ण पणे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्यामुळे शेतकरी पुर्ण हतबल झाले आहे.

भात पेरणी पासून ते लागवड पर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
दिवसेंदिवस भात लागवडीचे क्षेत्र कमी होत असतांना त्यातच नैसर्गिक प्रकोप होत असल्यामुळे भात शेती करावी की नाही अशी भिती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.कारण या भात शेतीच्या जोरावर आपण घरातील कुटुंबाचा उदार निर्वाह करु शकतो मात्र भात शेती पाण्याखाली जावून मोठे नुकसान होत असल्यामुळे भात शेती करावी की नाही?अशी स्थिती शेतकरी वर्गांची निर्माण झाली आहे.

मात्र शेतकरी वर्ग खचून नये यासाठी खालापूर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तातडीने पंचनामे करण्यात यावे या माध्यमातून खालापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुंढे,प्रमोद पवार ,अविराज बुरूमकर,बाळकृष्ण लबडे,अविनाश आमले, समिर पिंगळे,दिनेश शिंदे, सुनिल कुरुंगले,भरत साळुंखे,राजेंद्र मोरे, संतोष दळवी, तसेच शेतकरी वर्ग अदि शेतीच्या नुकसानी संदर्भात पत्र देण्यात आले.


१८ जुलैै २२ पर्यंत पावसाने सर्व शेतकरी वर्गांना मोठा धक्काच दिला यामुळे भात लागवड पाण्याखाली गेली असल्यामुळे काही शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले.मात्र नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हावे या दृष्टीकोणातून आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे (खालापूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष मुंढेे )
- Advertisment -

You cannot copy content of this page