भाद्रपदी बैल पोळ्यानिमित्त कार्ला गावात बैलांची मिरवणूक….

0
180

कार्ला प्रतिनिधी दि.6:आज मावळ तालुक्यात भाद्रपदी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बैलपोळ्या निमित्त तालुक्यासह कार्ला परिसरातील बैलांना सजवून मिरवणूक काढण्यात आली.वर्षभर शेतात राबणार्‍या बैलजोडीचे नाते घट्ट करणारा सण साजरा करण्यासाठी कार्ला परिससरातील शेतकरीदेखील सज्ज झाले होते.

आपल्या लाडक्या बैलजोडीसाठी विविध प्रकारच्या घुंगरमाळा,बाशिंगे,गोंडे,झालर व विविध रंगांच्या साहाय्याने सजविण्यात आलेल्या बैलांची ढोल ताशांच्या गजरात कोरोनाचे नियम पाळत एक नियोजित मिरवणूक कार्ला ग्रामस्थांकडून काढण्यात आली.बैल पोळा आला की बैल सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शेतकरी बांधवांची अलोट गर्दी बाजारात दिसून आली होती.

तसेच बैलजोड्या कमी झाल्याने बाजारात मातीच्या बैलजोडीच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र दिसून येत होते.लहान मुलांनी देखील मातीचे बैलजोडी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालत बैल पोळा साजरा केला.