Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन " वास्तूचे भूमिपूजन ६ ऑक्टोंबरला..

” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” वास्तूचे भूमिपूजन ६ ऑक्टोंबरला..

सर्वांनी उपस्थित रहाण्याचे ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचे आवाहन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीत मुद्रे येथे ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ” साकारण्यात येणार असून या भव्य दिव्य वास्तूचे ” भूमिपूजन ” कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११ – ०० वाजता तमाम आंबेडकरी अनुयायी , बौद्ध समाज व बहुजन वर्गाच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन ” आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांनी केले आहे . त्याचे निमंत्रण सर्व भीम तरुण सर्वांच्या घरोघरी कर्जत तालुक्यात वाटत आहेत.

कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल ५ करोड रुपयांचा निधी मंजूर झाला असून हि वास्तू ” न भूतो – न भविष्यती ” अशी सर्वांच्या अस्मितेची प्रतिकृती होणार आहे . कर्जत तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुयायी , व बौद्ध बांधव व बहुजन समाजाची खूप वर्षांपासूनची ” भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ” होणे , हि मागणी आता पूर्ण होणार आहे . त्यामुळे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिलेला शब्द पाळला असल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शासनाच्या ” वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ” कर्जत नगरपरिषद हद्दीत ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे ” या कामाकरिता रु.५,००,००,०००/- ( पाच कोटी ) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे . हि ” ऐतिहासिक वास्तू ” भव्य स्वरुपात असून त्यांत तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उभे स्मारक , लायब्ररी व संग्रहालय असणार आहे.

त्यामुळे या भव्य – दिव्य वास्तूची कर्जत नगरीत सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात सुवर्ण अक्षरात नोंद होईल , अशीच हि प्रतिकृती उभारण्यात येणार आहे , याचा सर्वाँना आनंद व उत्साह द्विगुणित झाला आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page