Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभारतीय बौद्ध महासभा - ज्येष्ठ नागरिक व संविधान गौरव समिती तर्फे कर्जतमध्ये...

भारतीय बौद्ध महासभा – ज्येष्ठ नागरिक व संविधान गौरव समिती तर्फे कर्जतमध्ये ” क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले ” जयंती उत्साहात साजरी !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) भारतीय बौद्ध महासभा – ज्येष्ठ नागरिक व संविधान गौरव समिती तर्फे कर्जतमध्ये ” क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले ” यांची जयंती विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी संस्कार उपाध्यक्ष हरिभाऊ गायकवाड यांनी केले तर सूत्र पठण ज्येष्ठ बौद्धाचार्य मनोहर ढोले यांनी केले , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास ज्येष्ठ नागरिक विश्वास बडेकर , जगताप तसेच संविधान प्रस्ताविकेला शिवाजी गायकवाड व गोपाळ जाधव यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर दिप प्रज्वलित व सुगंधित वातावरण उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कर्जत तालुक्यातील मेरिटमध्ये डॉक्टर व इतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला , यामध्ये डॉ. प्रणव सुनील गायकवाड – आसल ( एमबीबीएस ) , डॉ. स्वप्नील श्यामजी रोकडे – वदप ( बीएमएस ) , आयुष्यमानिनी डॉ. मिनल विनोद जाधव – नेरळ (बीएचएमएस ) , आयु . शुभम दौलत ब्राह्मणे – कर्जत ( असिस्टंट बँक मॅनेजर ) , या सर्वांना जेष्ठ नागरिक आयु. जी. बी. गायकवाड , गुलाब शिंदे , बबन ओव्हाळ , दिपक भालेराव , यशवंत खैरे , के. के . गाढे , बबन गायकवाड , हरिभाऊ गायकवाड , यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले . यावेळी ” क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले ” जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर व्याख्याते जोंधळे सर यांनी जीवन चरित्र सांगितले . यावेळी सरणतय घेवून उद्योजक आयु. गणेश कांबळे – कर्जत यांच्याकडून अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी सदर कार्यक्रमास ज्येष्ठ मान्यवर रमेश खैरे , दौलत ब्राम्हणे, राम सूर्यवंशी , निवृत्ती गायकवाड , दशरथ जाधव , बबन ओव्हाळ , बबन गायकवाड , विश्वास बडेकर , जगताप , विष्णू भालेराव , गुलाब शिंदे , हरिभाऊ गायकवाड , दिपक भालेराव , विजय ओव्हाळ , शांताराम भालेराव , सोपान धनवे , संजय खंडागळे , वसंत निकाळजे , दिगंबर जाधव , उपासिका उज्वला साळवी , शुभांगी गायकवाड , सुवर्णा भिंगारदिवे , सौ जगताप , सीमा विनोद जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक व संविधान गौरव समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पिण्याच्या पाण्याची व फिल्टरची सोय , सोलर लॅम्प , रंगरंगोटी , सुशोभीकरण , लॅम्पलाईट व स्मारकाला सुशोभीकरण आदी कामे ज्येष्ठ नागरिकांच्या स्वखर्च केली जात आहे , तसेच दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कर्जत येथे सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहण आयु. वसंत धर्मा सुर्वे – आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून सकाळी ११ वाजता सामुदायिक सूत्र पठण घेण्यात येणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page