Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा पर्यटन सचिव पदी बबन गायकवाड यांची नियुक्ती !

भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा पर्यटन सचिव पदी बबन गायकवाड यांची नियुक्ती !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा , शाखा तालुका कर्जत या धार्मिक संस्थेची सभा नुकतीच कशेळे येथील सारनाथ बुद्धविहार येथे पार पडली. यावेळी कर्जत तालुका पर्यटन उपाध्यक्ष बबन गायकवाड यांच्या कार्याला उभारी मिळावी म्हणून त्यांची रायगड जिल्हा पर्यटन सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु.महेंद्र मोरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.बबन गायकवाड हे कर्जत तालुक्यातील कोंदीवडे येथील असून सध्या ते कर्जत रेल्वे क्वॉर्टर येथे रहात आहेत. कल्याण येथे टेक्निशियन थ्रिल म्हणून कार्यरत आहेत.त्यांची रेल्वेत ३८ वर्षे सेवा झाली आहे .बबन गायकवाड यांच्या कार्याची घौडदौड पाहूनच त्यांना ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन इंजीनियरिंग शाखेच्या कल्याण अध्यक्ष पदी निवड नुकतीच झाली आहे.

धार्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य मोठे आहे . भारतीय बौद्ध महासभेचे ते कर्जत तालुका पर्यटन उपाध्यक्ष म्हणून काम करत होते . यावेळी तालुक्यातील बहुजन वर्गाला व बौद्ध बांधवांना बौद्ध धम्मातील तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या स्थळांचे पाहणी करण्यास नेले असून तालुक्यात देखील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ते अग्रेसर असतात . त्यांचे हे कार्य उत्तरोत्तर वाढण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेने त्यांना जिल्हा पर्यटन सचिव पदी नियुक्ती केली.

या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु.महेंद्र मोरे , उपाध्यक्ष राजा कवडे ,रायगड जिल्हाध्यक्ष काशीनाथ कांबळे , जिल्हा सचिव संजय जाधव , कोषाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , उद्योजक प्रवीण कांबळे , जिल्हा संस्कार सचिव प्रकाश गायकवाड , माजी पर्यटन सचिव पी.एस.गायकवाड , कर्जत तालुका अध्यक्ष के.के.गाढे , तालुका सचिव रविंद्र जाधव , माजी सचिव रविंद्र गायकवाड , संरक्षण उपाध्यक्ष गणपत खंडागळे , संस्कार उपाध्यक्ष एल.एम.भालेराव , माजी सचिव मारुती गायकवाड , हरिश्चंद्र जाधव , श्रामणेर संतोष सोनावणे , केंद्रीय शिक्षक कोषाध्यक्ष उल्हास जाधव , रामचंद्र रोकडे , रमेश गायकवाड , दिपक फाळे , संतोष रोकडे , केंद्रीय शिक्षक दिपक जाधव , ता.कोषाध्यक्ष ए.डी. जाधव , विभाग क्रमांक ५ व ६ चे अध्यक्ष बबन भालेराव , व त्यांची संपूर्ण कमिटी , उद्योजक सुरेश सोनावणे , श्याम रोकडे , शरद रोकडे , किसन रोकडे या सर्वांच्या उपस्थितीत बबन गायकवाड यांची रायगड जिल्हा पर्यटन सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

बबन गायकवाड यांचे सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा पर्यटन सचिव पदाच्या निवडीमुळे भारतीय बौद्ध महासभेचे काम अधिक जोमाने करून जिल्ह्यातील बौद्ध समाजाला धम्माचे ज्ञान अधिक होईल असे कार्य करीन, असे मत नवनिर्वाचित रायगड जिल्हा पर्यटन सचिव बबन गायकवाड यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page