Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त महेश देशमुख यांचे खोपोलीत सत्कार..

भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त महेश देशमुख यांचे खोपोलीत सत्कार..

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
खालापूर शहरातील साईबाबा नगर येथील तरूण महेश भीमसेन देशमुख हा जवान भारतीय सैन्य दलातून नुकताच सेवानिवृत्त झाल्यावर गावातील तरुणांनी एकत्र येत चौकातील शिवसृष्टी देखाव्या समोर सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करीत अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर गावातील तरूणांनी केलेल्या सत्काराने महेश देशमुख भावूक झाले होते.


साईबाबा नगर येथील महेश देशमुख भारतीय सैन्य दलात सन – 2004 साली भरती झाले होते.बेळगाव येथे ट्रेनिंग घेऊन मराठा बटालियन तुकडीतून काश्मीर येथे सिमेवर लढण्यासाठी सज्ज होते.महेश ज्यावेळी सौन्य दलात भरती झाले त्यावेळी साईनगर व राहटवडे परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला होता.

तर आपल्या गावातील तरुण देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावतोय याचा गावकऱ्यांंना अभिमान वाटत होता.तर सैन्यदलात यशस्वी देशसेेवा करित निवृृत्त झाल्यावर गावात तरूणांनी जंगी स्वागत करीत छोटेखानी कार्यक्रमात शाल,पुष्पगुच्छ आणि भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोख, स्वच्छता अभियान कार्यकर्ते समीर साठे,सचिन साठे,तुषार पाटील,मनोज ठाकरे,प्रमोद देशमुख, निलेश देशमुख,सचिन शिंदे तर रहाटवडे येथीलढोल तशा पथकाच्या वतीने पुपुष्प गुच्छ देऊन संतोष मालुसरे ( मामा ),मल्लीका अर्जून घडे,अमित दळवी,शुभम पवार,रोहन पोपलघट आदिनी महेश चा सत्कार केला या वेळी महेश चे वडील भीमसेन देशमुख तसेच बहीनी व परिवार तर गावातील तरुणांना सह महिला उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page